आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दारात मोठी वाढ

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर दुप्पटीने वाढल्याने देशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल प्रती लिटर 2 रुपये 21 पैशांनी महागलं आहे. तर डिझेलच्या दरात 1 रुपये 79 पैशांनी वाढ झाली आहे. हे नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

नोटाबंदीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात होती. ती शक्यता आज खरी ठरली आहे.