सहा वर्षात पेट्रोल दरात १० रुपयांची वाढ

petrol price rises

नवी दिल्ली : गेल्या सहा वर्षांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर तब्बल १० रुपयांनी वाढ झाली आहे. या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किंमतीत ६१ टक्के घट झाली आहे. यानंतरही सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ग्राहकांना कोणताही दिलासा दिला नाही. ६१ टक्के स्वस्त क्रूड खरेदी करूनही पेट्रोल आणि डिझेलचे दिवसागणिक चढत आहेत. स्वस्त क्रूडचा फायदा सरकारला मिळाला असतानाही सरकारने त्यावर कर वाढवत सतत तिजोरी भरवण्याचा उद्योग केला आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोलची आधारभूत किंमत सुमारे २६ रुपये प्रतिलिटर आहे. या वाहतुकीची किंमत ०.३६ रुपये आहे. यावरील उत्पादन शुल्क ३२.९८ रुपये प्रतिलिटर आहे. त्याचबरोबर व्हॅट (डीलर कमिशनसह) १८.९४ रुपये आहे. डीलरचे कमिशन अंदाजे ३ रुपये ७० पैसे आहे. अशाप्रकारे २६ रुपयांचे एक लिटर पेट्रोल ८१ रुपयांवर पोहोचते. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना प्रत्येक १ लिटरसाठी सुमारे ५१ रुपये मिळतात.

मोदी सरकार स्थापन झाले तेव्हा मे २०१४ च्या सुमारास पेट्रोलवर ९.४८ रुपये प्रतिलिटर आणि डिझेलवर ३.५६ रुपये कर होता. कर वाढून आता ३२.९८ रुपये प्रतीलिटर झाला आहे. डिझेलवरील प्रतीलिटरवरील कर ३१ रुपये ८३ पैसे झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून सातत्याने कराची आकारणी केल्यामुळे ग्राहकांना स्वस्त क्रूडचा फायदा मिळत नाही, तर त्याऐवजी ते पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त खर्च करावे लागत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER