सलग चौथ्या दिवशी इंधन दरात वाढ

Petrol-Fuel price hike

नवी दिल्ली : सलग चौथ्या दिवशी आज शुक्रवारी इंधन दरात वाढ झाली (Petrol-Fuel price hike) . दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे प्रतिलीटरचे दर 88 रुपयांच्याही वर गेले आहेत. पेट्रोल दरात आज झालेली वाढ 28 ते 29 पैशांची असून डिझेल दरातील वाढ 35 ते 38 पैशांची आहे.

दिल्लीत याआधी पेट्रोलचे दर 87.85 रुपये इतके होते, ते वाढून 88.14 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे डिझेलचे प्रतिलीटरचे दर 78.03 रुपयांवरून 78.38 रुपयांवर गेले आहेत. मागील 12 दिवसांत पेट्रोल दरात 4.13 रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेल दरात 4.26 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 28 पैशांनी वाढून 94.64 रुपयांवर गेले आहेत. डिझेलचे दरदेखील 38 पैशानी वाढून 85.32 रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे पेट्रोल, डिझेलचे दर वाढून अनुक्रम 89.44 रुपये आणि 81.96 रुपयांवर गेले आहेत. चेन्नई येथे हेच दर अनुक्रमे 90.44 रुपये आणि 83.52 रुपयांवर गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER