पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी; आरबीआयचे गव्हर्नर यांचे संकेत!

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी पेट्रोल-डिझेल दरांविषयी घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमती कमी होण्यासाठी करांमध्ये कपात करणार, असे संकेत त्यांनी दिले आहेत. सध्या पेट्रोलच्या दरामध्ये ६० टक्के तर डिझेलवर ५४ टक्के करांचा समावेश असतो. केंद्र सरकार इंधन तेलांवर एक्साईज ड्युटी, तर राज्य सरकार वॅट वसूल करते. गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

महागाईचा फटका सर्व क्षेत्रांना
एमपीसी मिनिट्सच्या (MPC Minutes) कार्यक्रमात बोलताना शक्तिकांत दास यांनी याबाबत संकेत दिले. डिसेंबर महिन्यात ग्राहक दर निर्देशांक ५.५ टक्के होते. क्रूड ऑईलचा किमती वाढल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंधन दर वाढत असल्याने महागाई वाढत आहेत. वाहतुकीच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रत्येक क्षेत्राला फटका बसत आहे, असे त्यांनी मान्य केले.

केंद्र राज्यांकडून इंधनावर करवसुली
खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादनात कपात केल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले. उत्पादन कमी झाल्याने तेल आयात करणाऱ्या देशांना फटका बसल्याचेही ते म्हणाले. कोरोनामुळे सरकारचा खर्च वाढला आहे. आर्थिक सुधारणा करण्यासाठी सरकार गुंतवणूक वाढवत आहे. याशिवाय भांडवली खर्च ३४ टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. सरकारला विविध योजनांवर खर्च करण्यासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे इंधनावर कर लावते. केंद्र आणि राज्य सरकारकडून पेट्रोल-डिझेलवर कर वसूल केला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरून केंद्र सरकार संकटात असल्याचे मान्य केले होते. पेट्रोल-डिझेल दरवाढीवर केंद्र आणि राज्य सरकार दोघांनी मिळून मार्ग काढण्याची गरज आहे, असे ते म्हणाले होते. तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी करणार आहे, असे सीतारामन म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER