पेट्रोल- डिझेलचे दर २५ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर

Petrol-diesel

इंधनाचे दर 25 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. पेट्रोल दरात (Petrol-diesel prices ) 15 पैशांची तर डिझेल दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर 82.49 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर 72.65 रुपयांवर गेले आहेत. गेल्या दोन दिवसांत तेल कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले होते. मात्र त्यानंतर आता दरवाढ करण्यात आली आहे.

दरवाढीनंतर मध्य प्रदेशातील भोपाळसह देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 90 रुपयांच्या (90RS) पुढे गेले आहेत. मुंबईत हे दर 89.16 रुपयांवर गेले असून डिझेलचे दर 79.22 रुपयांवर गेले आहेत. तामिळनाडूतील चेन्नई येथे पेट्रोल- डिझेलचे दर क्रमश: 85.44 आणि 78.06 रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे पेट्रोल 84.02 रुपयांवर तर डिझेल 76.22 रुपयांवर गेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER