हिवाळ्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतातच; धर्मेंद्र प्रधान यांचा अजब दावा

नवी दिल्ली : काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनी (Petrol-diesel prices hike) शंभरी ओलांडली आहे. यावर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर बोलणे म्हणजे धर्मसंकट आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. त्यानंतर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी इंधन दरवाढीवर अबज दावा केला आहे. हिवळ्यात पेट्रोल-डिझेलची मागणी वाढते, त्यामुळे किंमती वाढतातच. हिवाळा संपला की, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील, असा दावा धर्मेंद्र प्रधान यांनी एएनआयशी बोलताना केला आहे.

वाढत्या इंधनाच्या दरावर अर्थमंत्री सीतारमण यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, “या किंमती कधी कमी होणार, त्यावर आताच काही सांगू शकत नाही. यावर काही भाष्य करणे म्हणजे धर्मसंकट आहे.” केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यावर चर्चा करून मार्ग काढण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER