पेट्रोल-डिझेल दरवाढीने भारताला पुन्हा चटके; सौदीच्या तेल विहिरींवर हल्ले

Petrol - Diesel

नवी दिल्ली : रविवारी सौदी अरेबियाच्या तेल उत्पादित होणाऱ्या विहिरींवर हल्ले झाले. तेल ठिकाणांवरील हल्ल्यांचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये दिसून आला. बाजारांमध्ये तेलांच्या किंमतीत ३ टक्क्यांनी वाढ झाली. क्रुड ऑईलचा एक बॅरल ७१.३७ अमेरिकन डॉलर इतका झाला. वाढत्या तेलाच्या किंमतींचा भारतावर परिणाम होईल आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणखी वाढू शकतात. तेलाच्या आयातीवर भारताला सर्वाधिक खर्च करावा लागतो.

सौदी अरेबिया सर्वांत मोठा तेल उत्पादक

सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. भारत सर्वाधिक तेलाची आयात सौदी अरेबियाकडून करतो. अमेरिका आणि चीननंतर भारत जगातील सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. भारताने गेल्या आर्थिक वर्षात ८५ टक्के तेल आयात करून त्यावर १२० अब्ज डॉलर खर्च केले. यामुळे सौदी अरेबियाच्या तेल विहिरींवरील हल्ल्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. रविवारी सौदी अरेबीयाच्या रास तुनरा या ऑईल टर्मिनलवर हल्ला झाला. सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने हल्ला झाल्याचे मान्य केले आहे.

वाढत्या दरांची समस्या

२०२०मध्ये फेब्रुवारी महिन्यात क्रुड ऑईलच्या किंमती २० अमेरिकन डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामध्ये वर्षभरात ८३ टक्के वाढ झाली आहे. तेलाचे वाढते आंतरराष्ट्रीय दर हे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्यासाठी जबाबदार असल्याचा दावा केला जात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर १० डॉलरने वाढल्यास भारत सरकारचा खर्च वाढतो. भारतात पेट्रोलचे दर १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER