
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून सोमवारी पेट्रोल (Petrol) व डिझेल (Diesel) दरात वाढ करण्यात आली. ही सलग चौथ्या दिवशी झालेली वाढ असून पेट्रोलच्या दरात 7 पैशांची तर डिझेलच्या दरात 18 पैशांची वाढ झाली आहे.
या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर 81.53 रुपयांवर गेले असून डिझेलचे दर 71.25 रुपयांवर गेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 88.23 रुपयांवर तर कोलकातामध्ये हे दर 83.43 रुपयांवर गेले आहेत. चेन्नई, नोएडा, रांची आणि लखनौमध्ये हेच दर अनुक्रमे 84.53, 82.00, 81.12 व 81.92 रुपयांवर गेले आहेत.
मुंबईत डिझेलचे दर 77.73 रुपयांवर गेले असून कोलकाता येथे हे दर 74.82 रुपयांपर्यंत कडाडले आहेत. चेन्नईमध्ये एक लिटर डिझेलसाठी 76.72 रुपये मोजावे लागत आहेत. अन्य शहरांचा विचार केला तर नोएडा येथे डिझेल 71.73 रुपयांवर पोहोचले असून लखनौ 71.66 रुपयांवर दर गेले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला