पेट्रोल- डिझेल दरात ३० पैशांची वाढ

petrol price rises

नवी दिल्ली : आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेल दरात वाढ झाली. जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर 59 डॉलर्स प्रती बॅरलवर पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोल दरात 30 पैशांची वाढ झाली असून डिझेल दरात 30 ते 32 पैशांनी वाढ केली.

या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीसह मुंबई आणि इतर ठिकाणी पेट्रोलचे दर आजवरच्या उच्चांकी स्तरावर गेले आहेत. मुंबईतील पेट्रोलचे प्रती लीटरचे दर 93.49 रुपयांवर गेले असून दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथे हेच दर क्रमश: 86.95, 88.30 व 89.39 रुपयांवर गेले आहेत. मुंबईत डिझेलचे लीटरचे दर 83.99 रुपयांवर गेले असून दिल्लीत डिझेल 77.13 रुपयांवर, कोलकाता येथे 80.71 रुपयांवर तर चेन्नईमध्ये 82.33 रुपयांवर गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER