पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

petrol prices

नवी दिल्ली : इंधन दरवाढीचा आलेख चढताच असून आज बुधवारी पुन्हा तेल कंपन्यांनी (Oil Companies) पेट्रोलच्या (Petrol) दरात २९ ते ३० पैसे आणि डिझेलच्या (Diesel) दरात २५ ते २७ पैशांची वाढ केली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात दररोज वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (Indian Oil Corporation) दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ८७.६० रुपये आणि डिझेलचा दर ७७.७३ पैशांवर पोहचला आहे. तर मुंबईतील पेट्रोलचा दर ९४.१२ आणि डिझेल ८४.६३ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८८.९२ आणि डिझेल ८१.३१ रुपये, चेन्नईत पेट्रोल ८९.९६ आणि डिझेलचा दर ८२.९० रुपये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER