पेट्रोल-डिझेल पुन्हा दरवाढ

नवी दिल्ली : पुन्हा एकदा आज ३० पैशांनी पेट्रोल आणि ३५ पैशांनी डिझेल महागले आहे. सततच्या दरवाढीमुळे पेट्रोल शंभरीकडे वेगाने जात आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सलग आठव्या दिवशी इंधन दरात वाढ (Petrol-diesel price hike) केली असून पेट्रोल ३० पैसे तर डिझेल ३५ पैशांनी महागले आहे. सलग आठ दिवस केलेल्या दरवाढीने पेट्रोल आणि डिझेल सरासरी दोन रुपयांनी वाढले आहे. दिल्लीत आज एक लिटर पेट्रोल ८९.२९ रुपये झाले आहे.

डिझेलचा भाव ७९.७० रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९१.४५ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८४.७७ रुपये भाव आहे. कोलकात्यात पेट्रोल ९०.५४ रुपये तर डिझेल ८३.२९ रुपये झाले आहे. गेल्या दहा महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी दरवाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी वर्षभराचा उच्चांकी स्तर गाठला आहे. आज ब्रेंट क्रूडचा भाव ६३.३० डॉलर असून त्यात ०.८७ डॉलरची वाढ झाली. तर सिंगापूर क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये कच्च्या तेलाचा भाव ०.६९ डॉलरने वधारला आणि ६०.१६ डॉलर झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER