पेट्रोल आणि डिझेल उद्यापासून दोन रुपयांनी महाग

Petrol price Rise

मुंबई :- लॉकडाऊनमुळे उद्योग-धंदे बंद असल्याने सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडाला आहे. यावर हमखास कमाईचा मार्ग म्हणून राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी वाढवले आहेत. ही दरवाढ १ जूनपासून लागू होणार आहे.

राज्यात दरमहा सरासरी ११ लाख ६६ हजार किलोलिटर पेट्रोल व डिझेल विकले जाते. एक किलोलिटर म्हणजे एक हजार लिटर. म्हणजेच राज्यात दरवर्षी सुमारे १ कोटी ३९ लाख ९२ हजार किलोलिटर पेट्रोल-डिझेलची विक्री होते. २०१९ – २० मध्ये राज्य सरकारच्या तिजोरीत पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करातून २४ हजार ९०० कोटी रुपये आले होते.

महसुलाअभावी डबघाईला आलेल्या स्थितीला आधार देण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी वाढविले आहेत. महसुलासाठी पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित करात प्रतिलिटर प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनामुळे २५ मार्चपासून देशभरात टाळेबंदी आहे. उद्योग-व्यवसाय, वाहतूक सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांची गरज निर्माण झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER