मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी याचिका

Dhanajay Munde-Bombay HC
  • प्रतिज्ञापत्रात माहिती दडविल्याचे प्रकरण

मुंबई: मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून गेल्या वर्षीची विधानसभेची निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ‘दुसरी पत्नी’ (Second Wife)आणि तिच्यापासून झालेल्या मुलांची माहिती दडवून ठेवल्याबद्दल महाराष्ट्राचे समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल झाली आहे.

एका ३९ वर्षीय महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने वादाच्या भोवºयात अडकलेल्या मुंडे यांच्या अडचणी या न्यायालयीन प्रकरणाने आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपाचे कंडन केले असले तरी आरोप करणाºया या स्त्रीच्या बहिणीपासून आपल्याला दोन मुले झाली आहेतव त्यांना आपण आपले नाव लावले आहे, अशी त्यांनी कबुली दिली आहे. आपल्या या विवाहबाह्य संबंधांची आपल्या पत्नीस पूर्ण कल्पना आहे, असेही मुंडे यांचे म्हणणे आहे.

निवडणुकीत मुंडे यांच्या विरोधात उभे राहिलेले अपक्ष उमेदवारव पुणे येथील ‘राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती’चे अध्यक्ष हेमंत बाबुराव पाटील यांनी ही याचिका केली आहे. मुंडे यांची ‘दुसरी पत्नी’, तिची मुले व त्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात न दिली जाण्याची बाब उघड झाल्यानंतर आपण परळी पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष व निवडणूक आयोग व राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे ई-मेलने फिर्याद दिली. पण त्यांनी कोणताही दखल न घेतल्याने आपण ही याचिका करत आहोत, असे हेमंत पाटील यांनी म्हटले आहे.

पाटील याचिकेत म्हणतात की, निवडणूक आयोगाने केलेल्या नियमांनुसार निवडणूक लढविणाºया उमेदवाराने उमादवारी अर्जासोबत करायच्या प्रतिज्ञापत्रात स्वत:खेरीज पत्नी व मुले तसेच त्यांच्या मालमत्तांचीही माहिती देमे बंधनकारक आहे. पण मुंडे यांनी त्यांच्या या ‘दुसºया पत्नी’चा व तिच्यापासून झालेल्या मुलांचा उल्लेखही प्रतिज्ञापत्रात केलेला नाही. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार हा गुन्हा असून त्यासाठी सहा महिन्यांपर्यंत कैद व दंड अशी शिक्षा होऊ शकते. शिवाय हा भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० अन्वये फसवणुकीचाही गुन्हा आहे.

मुंडे यांच्यासारख्या पांढरपेशा ‘गुन्हेगारां’वर कायद्यानुसार कारवाई करून त्यांना दंडित केले नाही तर समाजातील अट्टल गुन्हेगार आणखी निर्ढावतील व ते उद्या सत्तेच्या खुर्चीत बसून आपल्यावर राज्य करतील, अशी भीतीही पाटील यांनी याचिकेत व्यक्त केली आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER