मध्य प्रदेशातील बहुमत चाचणी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात, भाजपाकडून याचिका दाखल

floor test madhya pradesh assembly

या प्रकरणी शिवराजसिंहांनी विधानसभा अध्यक्षाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


भोपाल :- कॉंग्रेसमधील दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह २२ आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकारवर ओढावलेले संकट काही काळासाठी टळले आहे. सोमवारी विधानसभा सुरू झाल्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांच्या एका मिनिटाच्या भाषणानंतर विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली. त्यामुळे आज विश्वासदर्शक ठरावच होऊ शकला नाही. करोनाच्या धास्तीमुळे विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर, कमलनाथ सरकार वाचवण्यासाठी कोरोनाचा डाव खेळला जात असल्याचाही आरोप कमलनाथ सरकारवर होत आहे.

आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे वरीष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनी मद्यप्रदेश विधानसभा अध्यक्षांविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Bahumat Chachni

राज्यपाल लालजी टंडन यांनी सोमवारी विश्वासदर्शक चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी विधानसभेत सारेच आमदार जमले होते. भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. परंतु, सकाळी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांना पत्र लिहून ही विश्वासदर्शक चाचणी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. पत्रात त्यांनी म्हटले होते की, “काही आमदारांना बंदी बनवून ठेवण्यात आलं आहे. जोपर्यंत सर्वांना सोडलं जात नाही आणि कोणताही आमदार दबावातून बाहेर येत नाही तोवर ही चाचणी घेतली जाऊ नये. ”

सोमवारी सकाळी मध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर राज्यपाल लालजी टंडन यांचे एक मिनिटाचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणाची पहिली आणि शेवटची ओळ वाचली. शिवाय त्यांनी राज्यघटनेचे पालन करण्याचे आवाहनही सर्व आमदारांना केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विश्वासदर्शक ठरावाशिवायच विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित केले. यामुळे तुर्तास तरी कमलनाथ सरकारवरील संकट टळले असले तरी भाजपाने मात्र, कोरोनाचा डाव खेळणा-या कॉंग्रेसला थेट कोर्टात खेचले आहे. आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्याने न्यायालय याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Web Title : Petition has been filed sc bjp seeking floor test madhya pradesh assembly

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)