सुशांत सिंगच्या घरगड्याची १० लाख भरपाईसाठी याचिका

‘एनआयए’ने बेकायदा डांबून ठेवल्याचा आरोप

Bombay High Court-Dipesh Sawant

मुंबई :- तीन महिन्यांपूर्वी मुंबईतील राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झालेला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा घरगडी दिपेश सावंत याने, राष्ट्रीय तपास एजन्सीने (NIA) आपल्याला ३६ तासांहून अधिक बेकादया डांबून ठेवले असा आरोप करत, त्याबद्दल १० लाख रुपये भरपाईसाठी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) रिट याचिका दाखल केली आहे.

राजेंद्र राठेड आणि अमित कोरोडिया या वकिलांमार्फत केलेली सावंत याची याचिका न्या. शिवाजी शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे ६ नोव्हेंबर रोजी सुनावणीस येईल, अशी अपेक्षा आहे.

सुशांत सिंगला अंमली पदार्थ पुरविल्याच्या आरोपावरून ‘एनआयए’ने सुशांत सिंगची मैत्रिण व अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, सुशांत सिंगचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्यासह सावंतला अटक केली होती. नंतर उच्च न्यायालयाने रियासोबत त्याला जामीन मंजूर केला होता.

सावंत याचा असा आरोप आहे की, ‘एनआयए’ने आपल्याला ४ सप्टेंबरच्या सकाळीच ताब्यात घेतले होते. परंतु ५ सप्टेंबरच्या संध्याकाळी सुटीकालीन दंडाधिकाºयांपुढे रिमांडसाठी हजर केले. अशा प्रकारे ‘एनआयए’ने आपल्याला ३६ तासांहून अधिक काळ बेकायदा डांबून ठेवले. ही गोष्ट आपण दंडाधिकाºयांच्याही लक्षात आणून दिली. पण त्यांनी अटक मेमोममध्ये अटकेच्या वेळेत काही तफावत दिसते खरे, एवढे म्हणण्याखेरीज काहीच केले नाही, असेही त्याचे म्हणणे आहे.

अशा प्रकारे ‘एनआयए’ने आपल्या मुलभूत हक्कांची पायमल्ली केली. शिवाय आरोपींची अटक व त्यांची कोर्टापुढे हजेरी यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने डी. के. बासू प्रकरणात ठरवून दिलेल्या बंधनकारक गाईडलाइन्सचे उल्लंघन केले. त्याबद्दल आपल्याला १० लाख रुपये नुसकानभरपाई मिळावी, अशी सावंत याची याचिकेत विनंती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER