भारतीय नागरिकत्व कायदा विरोधात मायनॉरिटी फ्रंटच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Feroz Khan

औरंगाबाद : भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा लोकसभेत मंजूर झाला. या कायद्याला देशभरात विरोध होत आहे. शहरातील मायनॉरिटी फ्रंटच्या वतीने या कायद्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. तसेच या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात १३ जानेवारी रोजी मायनॉरिटी फ्रंटच्या वतीने जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची प्राथमिक सुनावणी २२ जानेवारी रोजी होणार आहे. अशी माहिती मायनॉरिटी फ्रंटचे अध्यक्ष फेरोज खान यांनी बुधवार १५ जानेवारी रोजी एका पत्रकार परिषदेत दिली.

शहराच्या विविध भागात दोघांची आत्महत्या

भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा लोकसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. या कायद्याविरोधात देशभरात तीव्र आंदोलन सुरू आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे. शहरातील मायनॉरिटी फ्रंटच्या सेवाभावी संस्थेच्या वतीने या कायद्याविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवत एक लाख स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या होत्या. तसेच या विरोधात सर्वोच्च न्यायालयात १३ जानेवारी रोजी जनहीत याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील इजाज मकबूल, आकृती चौबे, कुनवर आदित्य सिंग, मोहम्मद ईसा हाकिन, ऐश्वर्या सरकार यांच्यामार्फत दाखल करण्यात आली आहे. शहरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मायनॉरिटी फ्रान्सचे अध्यक्ष फेरोज खान, डॉ परवेज अस्लम, डॉ जफर खान, डॉ फरहा गौरी आदींची उपस्थिती होती.