परमबीर सिंग यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; गुन्हा मागे घेण्यास घाडगे यांचा नकार

Parambir Singh

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. ‘ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्टनुसार गुन्हा रद्द करावा’ अशी याचिका परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी होताना आपली बाजूपण ऐकून घ्यावी, यासाठी पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. भीमराव घाडगे यांनी आज ही याचिका दाखल केली.

परमबीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत आपल्या विरोधात अनेक प्रकरणांत चौकशी सुरू आहे. गुन्हा दाखल आहे, या सर्व प्रकरणांची महाराष्ट्र सोडून इतर राज्यात चौकशी करावी आणि खटला चालवण्यात यावा, अशी मागणी परमबीर सिंग यांनी केली आहे.

परमबीर सिंग यांच्या या याचिकेसंदर्भात भीमराव घाडगे यांनी इंटर्व्हेन्शन याचिका दाखल केली आहे. घाडगे यांनी सुप्रीम कोर्टात इंटर्व्हेन्शन याचिका दाखल करत त्यांची बाजू ऐकण्याची मागणी केली आहे. परमबीर सिंग यांची याचिका ऐकताना आपल्यालाही ऐकण्यात यावं, असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच परमबीर सिंग यांच्याबाबत सुरू असलेल्या प्रकरणांची दुसऱ्या राज्यात चौकशी करण्यासदेखील घाडगे यांनी विरोध केला आहे. सिंग यांची चौकशी महाराष्ट्रात झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी याचिकेच्या माध्यमातून केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button