पीएच.डीकरिता ‘पेट-२’ परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना दिलासा

Pet -2 Exam Cancel

नागपूर : ‘पीएच.डी’त नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नागपूर विद्यापीठाने ‘पेट-२’ करिता नोंदणी करण्याची प्रक्रिया रद्द केली आहे. विद्यार्थ्यांना केवळ एकच परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र त्यांना आता त्रास सहन करावा लागणार नाही.

विद्यापीठातून ‘पीएच.डी’ करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विद्यापीठाने सुरुवातीला ‘पेट’ उत्तीर्ण होणे अनिवार्य केले. डॉ.प्रमोद येवले यांच्या

कुलगुरूपदाच्या कार्यकाळात विषयनिहाय ‘पेट-२’ सुरू करण्यात आली. काठिण्यपातळीत वाढ झाल्याने नोंदणीसाठी पात्र ठरणाऱ्यांची संख्या कमी झाली. शिवाय मानव्यशास्त्राच्या उमेदवारांची संख्या वाढली. त्यामुळे विधिसभेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. आर.जी. भोयर व डॉ. पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या तयार करण्यात आल्या होत्या. या समितीने ‘पीएच.डी’च्या जाचक अटींमध्ये बदल केले. त्यात नवा शिफारशीचा समावेश केला होता. त्यानुसार विद्यापीठाने शिफारशी मान्य केल्या आणि ‘पीएच.डी’ संदर्भात अधिसूचना काढली आहे.

‘RM’ आणि ‘अ‍ॅप्टिट्यूड’वर भर

विद्यापीठाने ‘पेट-१’च्या स्वरूपात बदल केला आहे. ‘रिसर्च मेथडॉलॉजी’ आणि ‘जनरल अ‍ॅप्टिट्यूड’वर परीक्षा आधारित असेल. शिवाय ५० प्रश्न हे बहुपर्यायी (Multiple Choice) असणार आहेत. मार्च महिन्यात नव्या नियमावलीनुसार ‘पेट’ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER