दुप्पट पैसे कमवण्याच्या नादात रत्नागिरीकरांची फसवणूक

raud case

रत्नागिरी/प्रतिनिधी: ३६ महिन्यात दुप्पट पैसे कमवण्याच्या नादात रत्नागिरीकरांची पुन्हा एकदा फसवणूक झाली आहे. १५ हजार रुपये गुंतवा आणि ३६ महिन्यात ६३ हजार मिळावा असे आमिष कंपनीकडून दाखविण्यात आले होते.

भविष्यात मोठा परतावा मिळणार या आशेवर अनेकांनी पैसे तर गुंतवलेच शिवाय हप्त्यांवर गाड्यादेखील घेतल्या. या स्कीममध्ये अनेकांनी पैसे गुंतवल्याने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा लवकरच उघड होणार आहे. या घोटाळ्यात शासकीय, निमशासकीय कर्मचारी अडकण्याची शक्यता मोठी आहे. त्यामुळे ज्यांनी ही स्कीम रत्नागिरीत आणली व मेंबर बनवले ते अडचणीत येणार असल्याची चिन्हे आहेत.

ही बातमी पण वाचा : अवैध मासेमारीवर धडक कारवाई करणार