रत्नागिरी जिल्ह्यातून आंबा वाहतुकीला परवानगी

Ratnagiri Mangoes - Nilesh Rane

रत्नागिरी/प्रतिनिधी : कोरोनामुळे आलेल्या संकटात रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार, व्यावसायिकांना मात्र थोडा दिलासा मिळाला असून आंबा वाहतुकीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे गुरुवार दुपारपासून ही वाहतूक सुरू झाली आहे. आंबा बागायतदारांनी संपर्क केल्यानंतर याची दखल भाजप नेते माजी खासदार यांनी घेऊन रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता तर माजी आमदार बाळ माने यांनी अन्य शहरात आंबा विक्रीसाठी प्रयत्न सुरू केले होते. अनेक बागायतदारांनी माजी खासदार निलेश राणे यांना संपर्क करून यातून मार्ग काढण्याची विनंती केली होती.

भाजपचे युवा नेते निलेश राणे यांनी याची त्वरित दखल घेत रत्नागिरी चे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना याबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. तर माजी आमदार बाळ माने यांनीही आंब्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. यात वाहतुकीचा प्रश्न सोडवत जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारपासून आंबा परजिल्ह्यात जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही वाहतूक होणार आहे. यामुळे आता बागायतदारांची चिंता मिटली आहे .