कोल्हापुरात केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स सुरु करण्यास परवानगी

कोल्हापूर :  जिल्ह्यातील केशकर्तनालये, सलून्स व ब्युटी पार्लर्स काही अटी व शर्तीस अधिन राहून सुरु करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत.

जिल्ह्यात लॉकडाऊनची मुदत 30 जून 2020 रोजी रात्री 12 वा. पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या दिनांक 31 मे 2020 रोजीच्या आदेशानुसार तसेच इकडील आदेशानुसार दिनांक 30/06/2020 रोजी रात्री 12 वा. पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. या आदेशामध्ये केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटीपार्लर्स प्रतिबंधित क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती.

मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या दिनांक 25 जून 2020 आदेशामध्ये केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स काही अटी व शर्तीस अधिन राहून प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरीत राज्यात दिनांक 27/06/2020 पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स खालील अटी व शर्तींना अधिन राहून सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER