कोल्हापुरात दिवाळीत फटाके फोडण्यासाठी सायं 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी

Diwali

कोल्हापूर : दिवाळीत 13 ते 16 नोव्हेंबरपर्यंत कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘Green firecrackers’ वाजवणे तसेच फोडण्यासाठी सायंकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत परवानगीचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

नवी दिल्ली येथील हरित लवादाच्या आदेशान्वये कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर शोभेची दारु (फटाका) विक्री व त्याच्या वापराबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार १३ ते १६ नोव्हेंबर अखेर हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.

कोल्हापूर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये फक्त ‘Green firecrckers’ ची विक्री करण्यास व वाजवणे-फोडण्यास परवानगी असेल. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER