कायदा अभ्यासक्रमांच्या प्रत्यक्ष परीक्षा घेण्यास मुभा

BCI

नवी दिल्ली :- संबंधित राज्य सरकारे व राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाकडून (SDMA) आवश्यक संमती घेऊन विधी महाविद्यालये, विधी विद्यापीठे व अन्य संस्थांनी कायदा अभ्यासक्रमांच्या परीक्षा प्रत्यक्ष पद्धतीने घेण्यास ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ने (BCI) परवानगी  दिली. यासाठी आधीच्या निर्णयात सुधारणा करण्याचा ठराव कौन्सिलच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मात्र कौन्सिलने स्पष्ट केले आहे की, जे विद्यार्थी अशा प्रत्यक्ष परीक्षांना बसू इच्छित नाहीत, बसू शकणार नाहीत किंवा परीक्षा देऊनही जे उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना कोरोनाची (Corona) साथ ओसरून परिस्थिती सामान्य झाल्यावर एक महिन्याच्या आत पुन्हा तीच परीक्षा देण्याची आणखी एक संधी द्यावी लागेल. तसेच कोरोनाची साथ लवकर आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नसल्याने विविध कायदा अभ्यासक्रमांच्या मधल्या वर्षांच्या व अंतिम वर्षाच्या परीक्षाही ‘ऑनलाईन’ घेण्याची परवानगी विधी महाविद्यालये व विद्यापीठांना देण्यात आली आहे.

प्रत्यक्ष परी क्षांप्रमाणेच अशा ‘ऑनलाईन’ परीक्षांनाही  जे विद्यार्थी बसू इच्छित नाहीत, बसू शकणार नाहीत किंवा परीक्षा देऊनही जे उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना कोरोनाची साथ ओसरून परिस्थिती सामान्य झाल्यावर एक महिन्याच्या आत पुन्हा तीच परीक्षा देण्याची आणखी एक संधी द्यावी लागेल. तसेच कोरोना साथीमुळे गेल्या वर्षी परीक्षा न घेता आल्याने ज्या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे त्यांनाही ‘ऑनलाईन’  किंवा प्रत्यक्ष परीक्षेत उत्तीर्ण होऊ न शकल्यास परिस्थिती सामान्य झाल्यावर राहिलेल्या विषयांची पुन्हा परीक्षा देण्याची आणखी एक संधी मिळेल, असेही कौन्सिलने नमूद केले आहे.

ही बातमी पण वाचा : दिल्लीत वकिलांना मोफत विमा तमिळनाडूत नवोदितांना ‘स्टायपेंड’

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER