
पुणे :- जनावरांपासून माणसास होणाऱ्या काही रोगांचे निदान करण्यासाठी जैवसुरक्षास्तर- ३ ( वीएसएल- ३) ही पश्चिम विभागीय पशुरोग निदान संदर्भ प्रयोगशाळा औंध येथे पशुसंवर्धन विभागाच्या जागेत लवकरच साकारणार आहे. सुमारे ७० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाकडून राज्य सरकारमार्फत केंद्राकडे पाठविण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच त्यादृष्टीने कामास सुरुवात होणार आहे.
केंद्र सरकार साठ टक्के आणि राज्य सरकार चाळीस टक्के निधी देणार आहे. पशु व पक्ष्यांमधील हानिकारक असलेले जीवाणू आणि प्रयोगशाळेत लाळ्या-खुरकत, घटसर्प फऱ्या, अंत्रविशार, मानमोडी आदींसह अन्य रोगांचे निदानाची सुविधा उपलब्ध आहे मात्र, जैवसुरक्षा स्तर- ३ प्रयोगशाळेच्या उभारणीमुळे राज्याल मोठी सुविधा निर्माण होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने महाराष्ट्रासह गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गोवा ही पाच राज्ये आणि दादरा-नगर- हवेली या केंद्रशासित प्रदेशासाठी पशुसंवर्धन विभागाच्या सध्याच्या प्रयोगशाळेस संदर्भ प्रयोगशाळा म्हणून मान्यता दिलेली आहे. राज्यात सध्या कोटी ४२ लाख ९७ हजार ७६५ इतके पोल्ट्री पक्षी आहेत.
पशुंमध्ये होणार्या विविध रोगांच्या आजारांचे निदान करण्याकरिता तपासणीसाठीचे नमुने सध्या केंद्र सरकारच्या विविध केंद्रीय रोगनिदान संस्थांकडे पाठवावे लागत आहेत. घोड्यांमधील विशिष्ठआजार हे हरियाणातील हिस्सार येथे, लाळ्या खुरकतचे निदान उत्तरप्रदेशातील इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट (आयव्हीआरआय), आनुवंशिक रोगाबाबत हरियाणातील कर्नाल येथे नमुने पाठवावे लागत आहेत. आता पुण्यातील प्रयोग शाळेत तपासणी होईल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला