पूर्ण प्रवासी क्षमतेने बससेवा चालवण्याची एसटी महामंडळाला परवानगी

St Bus

मुंबई :- कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी सेवा अनेक महिने बंद होती. मागील महिन्यात ती काही अटी-शर्थींवर सुरू करण्यात आली होती. एसटी सेवा सध्या सुरू असली तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने सेवा सुरू नाही. मात्र आता राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अटी-शर्थींसह ही परवानगी देण्यात आली आहे.

कर्नाटक आणि गुजरातमध्ये १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्याच्या धर्तीवर राज्य परिवहन मंडळाने हा निर्णय घेतला आहे. याआधी २० जुलैला सोशल डिस्टन्सिंग पाळत आसन क्षमतेच्या ५० टक्के आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती.

काय आहेत अटी?

  • बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना  मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक
  • वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतुक करूनच मार्गस्थ करण्यात याव्यात
  • लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवासी अशा तिरप्या (Z) पद्धतीने आरक्षण उपलब्ध आहे.
  • तथापि पूर्ण आसन क्षमतेने वाहतूक सुरू होत असल्याने सर्व आसने पूर्वीप्रणाणे आरक्षणासाठी उपलब्ध करून द्यावीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER