महाराष्ट्रात कंटेन्मेंट झोनबाहेर वॉटरस्पोर्ट्स, बोटिंग आणि पर्यटनस्थळांना परवानगी

Permission for watersports, boating and tourist destinations outside

मुंबई : राज्यात कंटेन्मेंट झोनबाहेरील वॉटरस्पोर्ट्स, बोटिंग, अॅम्युजमेंट पार्क आणि पर्यटनस्थळी इनडोअर मनोरंजन कार्यक्रमांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रालयानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे.

नेमक्या कोणत्या सुविधा होणार सुरू?

  • कंटेन्मेंट झोनबाहेरील जलक्रीडा यात नौकानयन आणि इतर मनोरंजन खेळांना परवानगी देण्यात आली आहे.
  • कंटेन्मेंट झोनबाहेरील अम्युजमेंट पार्क, पर्यटनस्थळावरील इनडोअर मनोरंजनाचे कार्यक्रम यांना परवानगी देण्यात आली आहे.
  • कंटेन्मेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळदेखील सुरू करत असतानाच सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड-१९ संदर्भातील सर्व नियमांचं पालन होईल याची काळजी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

Water Sports Order

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER