कोकण आणि कर्नाटकला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला परवानगी

National Highway connecting Konkan and Karnataka.jpg

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र व कर्नाटकसह कोकणला जोडणाऱ्या 103 किलोमीटरचा नव्या राष्ट्रीय महामार्गाला (National Highway) शासनाने नुकतीच परवानगी दिली. या महामार्गाचा नं.’ एनएच 48′ निश्चित करण्यात आला असून तो बांदा येथे ‘एनएच 66’ ला जोडला जाणार आहे.

जोडणाऱ्या संकेश्वर-बांदा असा हा महामार्ग असणारआहे. हा रस्ता आंबोली घाटातूनच जाणार आहे. आंबोलीच्या 15 किलोमीटर घाटातून हा मार्ग जाणार आहे हा महामार्ग कर्नाटक संकेश्वरवरून सुरू होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज-आजरा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली तसेच महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या बांद्याला जोडला जाणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणा-या या नव्या महामार्गाची संकल्पना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली होती. त्यानंतर रेडीपासून संकेश्वर पर्यंतच्या रस्त्याचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. मात्र, नव्या सर्वेक्षणात हा रस्ता संकेश्वरवरून रेडीला जोडण्याऐवजी बांद्याला जोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन मार्ग संकेश्वर ते बांदा असा करण्यात आला आहे. 103 किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे. त्याबाबतचे नोटिफिकेशन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून काढण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER