एल्गार परिषदेला परवानगी मात्र, शिवजयंती राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत खुपते? – भाजप

Keshav Upadhyay - Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त सरकारने एक नियमावली काढली आहे. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या नियमावलीत काही निर्बंध घातले आहेत. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

शिवजयंतीसाठी निर्बंध म्हणजे शिवसेनेचे (Shiv Sena) कॉंग्रेस (Congress) राष्ट्रवादीपुढे लोटांगण असल्याचे भाजपचे (BJP) प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी म्हटले आहे.

आता शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी करण्यावर बंधने घालून शिवसेनेने ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण’ चा नवा प्रयोग सादर केला आहे,” अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली ठाकरे सरकारवर केली आहे.

एवढेच नाही तर, “धार्मिक भावना भडकवणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी देताना आघाडी सरकार मागे पुढे पहात नाही. मात्र शिवजयंती राज्यकर्त्यांच्या डोळ्यात का खुपते?” असा सवालही उपाध्येंनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

तसेच, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. पोवाडे, बाईक रॅली, मिरवणूका यावर आघाडी सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. दारूची दुकाने, नाईटलाईफ, बार सुरु करण्यास परवानगी देताना सरकार गर्दीचा विचार करत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात कोरोनाच्या नावाखाली अनेक अडचणी आणल्या जात आहेत,” असं केशव उपाध्ये म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER