शिवसेना भवनाबाहेर स्वराज्य प्रतिकासह कायमस्वरूपी ‘जय महाराष्ट्र’ची गर्जना

Maharashtra Today

मुंबई : १ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. मात्र यंदाचा महाराष्ट्र दिन मुंबईकरांसह तमाम शिवसैनिकांसाठी कायमचा आठवणीत राहणार आहे. कारण आजपासून मुंबईतील शिवसेना(Shivsena)भवनाबाहेर स्वराज्य प्रतिकासह कायमस्वरूपी ‘जय महाराष्ट्र’ची (Jai Maharashtra)गर्जना होताना दिसणार आहे.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबईतील शिवसेना भवन असलेल्या राम गणेश गडकरी चौकाचं मुंबई महापालिका आणि आय लव्ह मुंबई या संस्थेच्या वतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सुशोभीकरणात स्वराज्य प्रतिकासह कायमस्वरूपी ‘जय महाराष्ट्र’ चा फलक लावण्यात आला आहे. अगदी शिवसेना भवनाबाहेरच हा फलक लावण्यात आल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. राज्यभरातून शिवसैनिक शिवसेना भवनाला दररोज भेट देत असतात. त्यामुळे या फलकासोबत सेल्फी घेताना ते जय महाराष्ट्राची गर्जना करतील यात काही शंकाच नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button