जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी स्वीप मोहिमेद्वारे जनजागृती

ठाणे : प्रतिनिधीठाणे जिल्ह्यात 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी केवळ 50 टक्केच होती. त्यात यंदाच्या लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात स्विप मोहिमेद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती स्वीपच्या नोडल अधिकारी रेवती गायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या मोहिमेद्वारे बॅनर्स व पोस्टर, पथनाट्य, रॅली, शाळेत चुनाव पाठशाला या उपक्रमांच्या माध्यामातून जनजागृती करण्यात येत आहे.

ही बातमी पण वाचा : दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप मार्फत राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील समीती सभागृहात पत्रकार परिषदेचे ायोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक अपर्णा सोमाणी, तहसिलदार सर्जेराव म्हस्के-पाटील आदी उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 करिता मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान हे आपले कर्तव्य समजून मतदान करावे, याकरिता जिल्ह्यात विविध स्तरावर मतदार जनजागृती रॅली, पथनाट्य, पोस्टर आणि बॅनर्सच्या माध्यामातून जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यातील दोन हजार विद्यालय आणि महाविद्यालयात चुनाव पाठशाला हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत आईवडील, नातेवाईक, शेजारी यांना निवडणुकीत मतदानासाठी प्रवृत्त करावे या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. शिक्षकांमार्फत देखील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती मार्गदर्शन करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात सन 2014 मध्ये पार पडलेल्या निवडणूकांच्यावेळी ग्रामीण भागात 60 टक्के मतदान झाले होते. तर, शहरी विकसीत भागात त्याचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी बनर्स आणि पोस्टरच्या माध्यामतून देखिल जनजागृती करण्यात येत आहे. रेल्वे अथवा गर्दीच्या परिसारात सह्यांची मोहिम राबविण्यात आली असल्याची माहिती देखिल गायकर यांनी दिली.

मंगळवारी सायंकाळी एसटी माहामंडळाच्या वतीने मतदान जनजागृती रॉली काढण्यात येणार आहे. यामध्ये सुमाीरे 600 कर्मचारी सहभागी होणार आहे. 19 एप्रिल रोजी रन फॉर वोट अशी 3 कीमीची मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याणमध्ये 22 ते 27 एप्रिल असे सहा दिवस चित्ररथा मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. 21 एप्रिल रोजी ठाणे, उल्हासनगर, मुंब्रा, भिवंडी आणि डोंबिवली या ठिकाणी 5 की.मी. सायकल रॉलीचे काढण्यात येणार आहे. तसेच 24 एप्रिल रोजी बायकर्स रॉली तर, 27 आणि 28 एप्रिलला प्रभात फेरी काढण्यात येणार असून लहानांपासून ते थोरांपर्यंताचा समावेश असणार असल्याची देखिल माहिती स्वीप नोडल अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.

चौकट 
ठाणे शहारात मागील काही दिवसांपुर्वी बिबट्याचे आगमन झाले होते. त्याच्या आगमनाने सर्वांचीच धांदल उडाली होती. त्यात आता, यंदाच्या वर्षीचा आयकॉन म्हणुन बिबट्याची निवड करण्यात आली आहे. तसेच या आयकॉनच्या माध्यामातून वोट ठाणे वोट असा संदेश देखिल देण्यात आला आहे.