पुदीना – सुगंधी पाचक वनस्पती!

पुदीना

सर्वांनाच पुदीना काही नवीन नाही. आजकाल अगदी घरी सुद्धा पुदीना उगविण्यात येतो. आयुर्वेदात या वनस्पतीला पुतिहा म्हटले आहे. दुर्गंध नष्ट करणारी वनस्पती म्हणजे पुतिहा. अनेक खाद्य पदार्थामधे आपण पुदीना वापरत असतो. हिरवी चटणी, पाणीपुरीचे पाणी, बिर्याणी ताक यात पुदीना हा लज्जत वाढविणारा घटक आहे. पाचक म्हणून पुदीना सर्वश्रुतच आहे. पुदीन्याचा वापर करून टुथपेस्ट, पाचक गोळी, क्रीम, पेय, मुखशुद्धी अशा अनेक उत्पादन बनविली जातात.

पुदीना किंवा पुतिहा उत्तम दुर्गंधनाशक असल्याने तोंडाचा वास येणे, तोंडाला चव नसणे अशा तक्रारींवर पुदीन्याची पाने चघळावीत. पुदीन्याची पाने वाळवून याचे चूर्ण मंजनाकरीता वापरू शकतो. जेणेकरून मुखदुर्गंध नाहीसा होईल. तोंडाला फोड येत असतील तर पुदीन्याच्या रसाने गुळण्या कराव्या.

  • पोटदुखी, वायु धरणे, व्यवस्थित पोट साफ न होणे या सर्व तक्रारींकरीता पुदीना वाटून जीरे घातलेले पाणी पिल्याने आराम पड़तो.
  • पुदीना चेहऱ्याचा तजेलपणा वाढवितो. मुलतानी माती पुदीना रस चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो.
  • गर्भावस्थेत मळमळ वांती हे त्रास जाणवत असतील तर पुदीना चटणी, पुदीना रस थोडी थोडी घेतल्यास आराम पडतो.
  • दुषित पाणी पिण्याने होणाऱ्या विकारांवर, कृमि विकारावर पुदीन्याचा रस अतिशय उपयुक्त ठरतो.
  • मूत्रविकार मूत्रदाह यावर पुदीन्याचा रस उपयोगी आहे.
  • शिरःशूल होत असेल तर पुदीन्याचा रस लावावा. अपचन, अजीर्ण यामुळे डोकं दुखत असल्यास पुदीन्याचा रस पोटातून सुद्धा घ्यावा.
  • उचकी थांबत नसेल तर पुदीन्याची पाने साखरेसह चघळावी.
  • पुदीना कफवातशामक, वातानुलोमन करणारा आहे. स्त्रियांना अनियमित मासिक स्त्राव होत असेल तर पुदीन्याचे आहारात सेवन करावे. अथवा पुदीन्याचा रस घ्यावा.
  • असा हा बहुगुणी पुदीना आहारात, गुळण्या करण्यास नक्की वापरावा.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER