लोकप्रतिनिधींना गरज नाही, सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्या, चंद्रकांत पाटलांचा टोमणा

Chandrakant Patil

मुंबई : ठाकरे सरकारने अनेक नेत्यांची सुरक्षा कमी केली. यात बहुसंख्य विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. यावर सरकारला टोमणा मारताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणालेत, लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही. हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्या.

यासंदर्भता त्यांनी ट्विट केले – महाविकासआघाडी सरकारने माझी आणि काही लोकप्रतिनिधींची सुरक्षा हटवली आहे. त्यासाठी सरकारचे आभार! राज्यात कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघेही राज्य सरकारला विनंती करतो की, जोपर्यंत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ठीक होत नाही, महिलांना पुरेसे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही.

आम्हा सर्वांच्या सुरक्षा ताफ्यातून ज्या पोलीस जवानंना वगळण्यात आलं आहे. त्यांना महिला सुरक्षेचा विशेष कार्यभार देऊन गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षेची खरी गरज लोकप्रतिनिधींना नसून जनतेला आणि महिलांनाच आहे.

पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षा कवच आहेत. त्यामुळे आमची काळजी न करता राज्यातील सुव्यवस्था नीट राहावी, याकडे राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे. पत्रकार आणि राज्य सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबल्यामुळे न्यायालयाकडून सतत सरकारवर वाभाडे निघत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिसांची उर्जा वाया न घालवता ती इतर ठिकाणी वापरण्यात यावी, अशी अपेक्षा आहे.

यांच्या सुरक्षेते कपात

  • विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने कमी केली आहे.
  • फडणवीसची सुरक्षा झेड + होती ती आता वाय + केली आहे.
  • अमृता फडणवीस यांची सुरक्षा अगोदर वाय + ती आता एक्स केली आहे.
  • देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात यानंतर बुलेटप्रूफ कार नाही.
  • राज ठाकरे यांच्याकडे पूर्वी झेड सुरक्षा होती. जी आता Y + करण्यात आली आहे.
  • रामदास आठवलेंची वाय + सुरक्षा आत्ता विना एस्कॉर्टशिवाय असेल.
  • भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांच्याकडे वाय + सुरक्षा होती जी आता रद्द करण्यात आली आहे.
  • भाजपा नेते आशिष शेलार यांना वाय + सुरक्षा होती. ती आता वाय करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER