आदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद यात्रेकडे लोकांनी फिरवली पाठ, धुळ्यात गर्दीच नाही

aditya thakre

धुळे : युवा सेना नेता आदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद यात्रेकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे त्यांच्या धुळे येथील कार्यक्रमात दिसून आले. आदित्य ठाकरे स्टेजवर आले असता समोरील प्रेक्षकांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे शिवसेना नेत्यांचा हिरमोड झाला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढली. आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत आहेत. आपण पद मिळविण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढली नसल्याचे आदित्य यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याबद्दल आदित्य ठाकरे जनतेचे आभार मानले.

दरम्यान शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आल्यास आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री होईल असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्या दृष्टीने शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाबाबत विचारे असता त्यांनी परत तीच री ओढली की ” आमचे ठरले आहे.”