लोकांच्या नोकऱ्या हिसकावणारे देत आहेत, नोकऱ्या देण्याचे आश्वासन !

- जे. पी. नड्डा यांची तेजस्वी यादववर टीका

JP Nadda & Tejaswhi Yadav

पाटणा :- ज्यांनी बिहारमध्ये अराजक माजवले, लोकांच्या नोकऱ्या हिसकल्यात तेच आज नोकऱ्या देण्याचे आश्वासन देत आहेत, या शब्दात भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी दिलेल्या नोकरीच्या आश्वासनावर टीका केली.

राजदच्या राजवटीत कशी अराजकता होती याची उधाहरण देताना ते म्हणालेत, गोपालगंजच्या दलित जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची पाटण्याला जात असताना गाडीच्या खाली उतरवून हत्या करण्यात आली इतपर्यंत अराजकता पोहचली होती. आज पोलीस महासंचालक आहेत ते तेव्हा पोलीस अधीक्षक होते. तेव्हा त्यांच्यांवर शहाबुद्दीनने गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, आता नितीश सरकारमध्ये शहाबुद्दीन तुरुंगात आहे.

राजदच्या राजवटीत विजेची स्थिती कशी होती हे सांगताना ते म्हणाले की – ‘मी बिहारमध्ये शिकलो आहे. तेव्हा दोन तास जरी वीज आली तरी आम्ही लोक म्हणायचो ‘आली…आली…आली! तोच वीज जायची. आम्ही म्हणायचे गेली…गेली…गेली. तेव्हा २४ तास वीज हा विचारही कुणी करु शकत नव्हत.

बदल झाला

एनडीएच्या राजवटीत बदल झाला. १५ वर्षांपूर्वी बिहारमध्ये कोणतीही निवडणूक आली की जाती, धर्माची चर्चा व्हायची. समाजाला विभाजित करण्याच्या गोष्टी केल्या जायच्या. आताच्या निवडणुकीत मात्र आमचे उमेदवार विकासावर बोलत आहेत. सरकारच्या कामाची माहिती देतात. हा मोठा बदल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आल्यानंतर त्यांनी राजकारणाचा चेहराच बदलला आहे, असे नड्डा म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER