अनुष्का विराटचे मूल आल्यानंतर लोकं तैमुरला विसरतील

Anushka Kohali -Sharmila Tagore

करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खानला मुलगा झाल्यानंतर त्याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. ते आजही कायम आहे. तैमूर काय करतो, कुठे जातो, कोणते कपडे घालतो, कोणा बरोबर खेळतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असते. फोटोग्राफर त्याचे फोटो काढण्यासाठी धडपडत असतात. करीना कपूरही सोशल मीडियावर तैमूरचे विविध रूपातील फोटो शेअर करीत असते. त्यामुळे तैमूर (Taimur) सध्या सेलिब्रिटी झालेला आहे. मात्र विराट आणि अनुष्काला मुलगा झाल्यानंतर लोकं तैमुरकडे दुर्लक्ष करतील आणि त्या दोघांच्या मुलाकडे लक्ष देतील. हे वाक्य अन्य कोणाचे नसून करिनाची सासू शर्मिला टागोरचे (Sharmila Tagore) आहे.

स्वतः करीनानेच ही माहिती एका मुलाखतीत दिली आहे. करीना आणि शर्मिला यांच्या गप्पांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या मुलाखतीत करीना कपूरने सासू शर्मिला टागोरला, तैमूरला मिळत असलेल्या अटेंशनबाबत विचारले. त्यावर शर्मिला टागोर यांनी उत्तर देताना म्हटले, सोशल मीडिया हा एक चिंतेचा विषय आहे. तुमचा मुलगा त्यातून खूप काही शिकतो. त्यावर तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. जेव्हा तो मोठा होईल तेव्हा तो स्वतः सोशल मीडियावर येईल.

शर्मिला टागोर यांनी पुढे असे म्हटले की, मला असे वाटते सोशल मीडिया तुम्हाला अगोदर खूप उंचावर घेऊन जातो आणि नंतर धाडकन खाली पाडतो. उद्या जेव्हा अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला मूल होईल तेव्हा सगळेजण तैमूरला विसरतील.

या मुलाखतीत शर्मिला टागोर यांनी करीना कपूरची खूपच प्रशंसा केली आहे. शर्मिला टागोर म्हणतात, करीना कपूर तिच्या कामात बिझी असली तरी माझ्या टचमध्ये असते. मी जर तिला मेसेज केला तर ती लगेच रिप्लाय करते. मात्र सैफ आणि सोहा त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच माझ्या मेसेजला रिप्लाय करतात. मी जेव्हा घरी येते आणि काही खायला मागते तेव्हा करीना ताबडतोब मला खायला देते. अशी आठवणही शर्मिला टागोर यांनी या मुलाखतीत सांगितली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER