शिवसेनेला जनता पाताळात गाडेल, २०२२ मध्ये होणार सुरुवात – भातखळकर

Atul Bhatkhalkar - Uddhav Thackeray

मुंबई : मुंबई मनपाच्या निवडणुकीत शिवसेनाच (Shiv Sena) जिंकेल, असा दावा ‘सामना’मधून करण्यात आला. त्यावर भाजपाचे (BJP) आ. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करून टोमणा मारला- ”महापालिकेवरून भगवा उतरणार नाही या सामानातल्या भावनेशी मी सहमत आहे. फरक एवढाच की यावेळी भाजपाचा भगवा फडकेल. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर मिरवलेले हिंदुहृदयसम्राट हे बिरुद सत्तेच्या सोयीसाठी नाकारणाऱ्या शिवसेनेला जनता पाताळात गाडेल; २०२२ मध्ये त्याची सुरुवात होणार आहे.” असं भातखळकर यांनी ट्विट केलं आहे.

सामानाने अग्रलेखात म्हटले आहे – मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्क नाकारण्यासारखेच आहे. मुंबई महापालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसांचे मुंबईशी नाते तोडण्यासारखेच आहे. भगवा उतरविणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे ही १०५ मराठी हुतात्म्यांशी सरळ सरळ बेइमानी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER