सतेज पाटील यांच्या अहंकाराला जनताच उत्तर देईल : अमल महाडिक

Amal mahadik & Satej patil

कोल्हापूर :- पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या अहंकाराला जनताच उत्तर देईल, अशा शब्दात माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी टीका केली. ते म्हणाले, महाडिकांवर टीका केली की आपण चर्चेत येतो हे माहीत असल्याने महाडिकांच्या नावाचा अनेकजण जप करतात. पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील कार्यक्रमात अप्रत्यक्षपणे टीका केली. ज्यांच्यापासून तुमच्या राजकारणाची सुरुवात झाली. त्यांच्याकडेच बोट दाखवत तुम्ही अहंकार मिरवताय. विरोधात जाणाऱ्यांना संपविण्याची भाषा करतात. जनता सर्व उघड्या डोळ्यांनी हे पाहत आहे. तुमचा हा अहंकार जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही.

भाजप सरकारच्या काळात शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आला. सध्या शहरातील विकास कामांचे आपण व आपले नगरसेवक उद्घाटन करत आहात. ती कामे देखील भाजप सरकारच्या काळातच मंजूर झाली आहेत. कसबा बावड्यातील पाण्याच्या टाकीचा प्रश्नही बरेच वर्षे रखडला होता. त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ बावडेकरांवर आली होती.

टाकी कोणाला बांधायला जमत नसेल तर मी बांधून देतो, असे आश्वासन महादेवराव महाडिक यांनी दिले होते. त्यामुळे आमच्यावर बोलण्यापेक्षा टाकीच्या कामाला निधी कोठून आला? मंजुरी कधी मिळाली, काम पूर्ण करण्यास विलंब का लागला? याचे उत्तर देण्याचे धाडस नसेल तर जाहीर माफी मागावी, असेही महाडिक म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मतदार नोंदणीसाठी फक्त मिस्डकॉल द्या : पालकमंत्री सतेज पाटील यांचा उपक्रम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER