लठ्ठ मुलीशी लग्न करा आणि जगा १० पट जास्त आनंदी आयुष्य

marry fat girl

आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नाला जरा जास्तच महत्व आहे. त्यात मग मुलगा आणि मुलगी हे दिसायला कसे आहेत ? त्यांची उंची मिळते की नाही ? बांधा लठ्ठ आहे की सडपातळ या सर्व गोष्टी अगदी बारकाई ने पहिल्या जातात पण संसार टिकण्यासाठी किंवा तो आनंदी करण्यासाठी खरंच या गोष्टी कितपत मायने ठेवतात.

खरं तर सुखी वैवाहिक आयुष्यासाठी गरजेचं असतं ते सामंजस्यपणा, तडजोड करण्याची वृत्ती , एक मेकांना पुरेसा वेळे देणे, कमीपणा घेणे, एकमेकांचा सन्मान करणे, विचारांची देवाणघेवाण करणे परंतु आता या यादीमध्ये आणखी एका प्रमाणाचा समावेश झाला आहे. हे प्रमाण म्हणजे एखाद्या लठ्ठ मुलीसोबत लग्न केल्यास पुरुष दहा पटीनं आनंदी आयुष्य जगतात आणि हे त्यांच्या सुखी विवाहाचं कारणदेखील ठरू शकतं.  खुद्द संशोधकानी ही माहिती एका अभ्यासातून दिली आहे.

ही बातमी पण वाचा : आपल्या जोडीदाराच्या हाथ पकडण्याच्या पद्धतीने ओळखा तुमच प्रेम किती अटूट आहे

वैवाहिक सुखासाठी गोंडस लठ्ठ महिलेसोबत लग्न करणं फायदेशीर ठरू शकते, असा शोध नॅशनल ऑटोनोमस युनिर्व्हसिटी ऑफ मेक्सिकोच्या (Autonomous University of Mexico) संशोधकांनी लावला आहे. १०० जोडप्यांच्या वैवाहिक जीवनाचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी हा आगळावेगळा शोध लावला आहे. अभ्यासाद्वारे महिलांचा शारीरिक बांधा आणि त्यांच्या पार्टनरच्या सुखाच्या-आनंदीच्या पातळीसंदर्भात काही मनोरंजक गोष्टी संशोधकांनी मांडल्या आहेत. ज्या पुरुषांनी लठ्ठ महिलांसोबत लग्न केले आहे, ते पुरुष आयुष्यात दहा पट आनंदी असल्याचा निष्कर्ष संशोधनाद्वारे समोर आला आहे. त्यामुळे तुमची बायको किंवा होणारी बायको जर का काहीशी लठ्ठ असेल तर तुमची गणना ही या आनंदी लोकांच्या यादीत करायला हरकत नाही.

ही बातमी पण वाचा : नवीन लग्न झाल्यास ‘या’ गोष्टी लक्षात असू द्या