
मुंबई : महाविकासआघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi) राज्यात नुकतीतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्त ‘द स्ट्रेलेमा’ या संस्थेने सरकारच्या कामगिरीबाबत र्व्हेक्षण केले. सर्वसामान्यांना विविध मुद्द्यांवर, सरकारच्या कामगिरीवर काय वाटते याचा अंदाज घेतला. ११ ते २४ नोव्हेंबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. राज्याच्या सर्व विभागाचा यात समावेश होता. १० हजार लोकांशी संपर्क करण्यात आला.
सर्वेक्षणात विचारलेले प्रश्न –
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची कामगिरी कशी वाटते?
समाधानकारक : ३४ टक्के
समाधानी नाही : ५३ टक्के
सांगता येत नाही : १३ टक्के
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची कामगिरी कशी वाटते
समाधानी : ५९ टक्के
समाधानी नाही : ३२ टक्के
सांगता येत नाही : ९
भविष्यात कोणाला मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल
उद्धव ठाकरे : २४ टक्के
अजित पवार : २१ टक्के
देवेंद्र फडणवीस : १९ टक्के
बाळासाहेब थोरात : ५ टक्के
सांगता येत नाही : १७ टक्के
यापैकी नाही : १४ टक्के
महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीविषयी
समाधानी : ६० टक्के
समाधानी नाही : ३० टक्के
सांगता येत नाही : १० टक्के
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला