जनतेने भाजपला नाकारले, राज्याचं राजकीय चित्र बदलतंय – शरद पवार

Sharad Pawar

पुणे :- शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) भाजपचा (BJP) धुव्वा उडवत जोरदार मुसंडी मारली आहे. सहा जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर एका जागेवर भाजप तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय प्राप्त केल्याचं चित्र सध्या दिसत आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला टोला लगावला.

धुळे आणि नंदुरबारचा निकाल आश्चर्यकारक नाही. कारण त्या ठिकाणचे उमेदवार हे विद्यमान आमदार होते. त्यांनी पक्षांतर केल्यामुळे राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांचा विजय खरा विजय म्हणता येणार नाही. पण बाकीच्या ठिकाणचा निकाल हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि गेल्या वर्षभरात केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली पावती आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. जवळपास ५ दशकं हा मतदार संघ भाजपकडे होता. गडकरी आणि फडणवीस यांच्याकडे ही जागा गेली अनेक वर्ष होती. पुण्यातील पदवीधर मतदारांनीही आम्हाला समर्थन दिलं नव्हतं. नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला आहे, असे म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला.

पण यंदा पुण्याचा निकालही मोठ्या मतांनी स्पष्ट झाला आहे. या बदल म्हणजे महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. या बदलाला महाराष्ट्रातील लोकांचा पाठींबा आहे, असंच या निकालातून पाहायला मिळत आहे. मागच्या निवडणुकीत ते कसे निवडून आले हे माहिती आहे. ‘चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा विनोदी विधान करणाचा लौकिक आहे. मागच्यावेळी आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते त्यामुळे ते विजयी झाले. यावेळी त्यांना अंदाज होता म्हणून त्यांनी पुणे शहरातील त्यांच्या दृष्टीनं सोयीचा मतदारसंघ निवडला. चंद्रकांत पाटील यांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता’, असा टोला शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नसल्याचंही पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

ही बातमी पण वाचा : पुढची अनेक वर्षे महाविकास आघाडी सरकार चालेल, शरद पवारांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER