जनतेने पोकळ आश्वासने , जातीयवादाच्या राजकारणाला नाकारले – अमित शाह

Amit Shah

मुंबई : बिहारच्या (Bihar) प्रत्येकाने पुन्हा एकदा पोकळ आश्वासने आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारत एनडीएच्या विकासवादाची निवड केली आहे. हा प्रत्येक बिहारवासीयाच्या आशा आणि आकांक्षांचा विजय आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी म्हटले आहे . त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासन यांची पुन्हा निवड करण्यासाठी मी बिहारच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. मुख्यत: बिहारचे तरूण आणि महिलांना धन्यवाद देतो ज्यांनी बिहारची सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्यासाठी एनडीएला बहुमत मिळवून दिले , असेही शाह म्हणाले.

या निवडणुकीमध्ये जनतेनं ज्या उत्साहानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि एनडीएच्या धोरणांना समर्थन दिलं ते नक्कीच उल्लेखनीय आहे. या निकालामुळे मोदी सरकारच्या करोनाविरुद्धच्या यशस्वी लढाईत गरीब, मजूर, शेतकरी आणि तरूण वर्गाचा विश्वास दिसून आलाच, पण त्याचबरोबर देशाची दिशाभूल करणाऱ्यांनाही धडा मिळाला असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं अर्थात NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून NDA ने १२५ जागांवर विजय मिळवला. या १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपाने , ४३ जागा जदयूनं तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER