५० वर्षांहून जास्त वयाच्या व्यक्तींना मार्चपासून मिळणार कोरोना लस

Dr. Harsh Vardhan - Coronavirus Vaccine

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी कोरोना लसीकरणासंदर्भात (Corona Vaccination) घोषणा केली. मार्चपासून ५० वर्षांहून जास्त वयाच्या नागरिकांना लसीकरण सुरू होईल. सात दिवसांपासून १८८ जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, “लस आली असली तरीही नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आज देशात दोन लस उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना ८० ते ८५ लाख लस देण्यात आली आहे. २० ते २५ देशांना लसीचा पुरवठा करण्यात आले आहे. सध्या देशात विविध पातळ्यांवर १८ ते २० लसींवर काम सुरू आहे. त्यातील काही लसी पुढील काही महिन्यांत येऊ शकेल. भारताने सर्वांसाठी आरोग्यसेवेचे स्वप्न शक्य करून दाखवले आहे. प्राचीन वैद्यकीय पद्धतीचा वापर करून आपण देशात आरोग्याचे मोठे नेटवर्कही उभारू शकतो.”

कोरोनाचे आकडेवारी सांगताना ते म्हणाले की, देशात आतापर्यंत १ कोटी ९ लाख १६ हजार ५८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १ कोटी ६ लाख २१ हजार २२० जण बरे झाले आहेत. देशात सध्या बरे होण्याचा दर ९७.२९ टक्के इतका आहे. भारतात जगातील सर्वात कमी मृत्युदर १.४३ टक्के आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER