रेमडेसिवीर न मिळाल्याने लोक रस्त्यावर; माणूस जगणं महत्त्वाचा; भुजबळांचा केंद्रावर हल्ला

Remedesivir-Chhagan Bhujbal

नाशिक : राज्यात दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यातच आता लसीच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना लसीच्या (Corona vaccine) तुटवड्यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. अमूकच लस कशाला हवी? मिळेल ती लस घेऊन देशातील जनतेला द्या ना, लसीचा अट्टाहास करू नका. अरे, माणूस जगला पाहिजे, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीकासुद्धा केली. ते म्हणाले की, “लंडनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यांनी आपली माणसे जगवण्यासाठी मिळेल त्या लस घेतल्या. अमूकच लस हवी असा अट्टाहास केला नाही. लंडनच्या प्रशासनाने ती लस स्वदेशी आहे की विदेशी आहे हे काहीच पहिले नाही. आपल्याच देशातील लस घ्या असा आग्रह केला जात आहे. अमूकच लस कशाला? अरे, माणूस जगला पाहीजे पहिले. हीच लस घ्या, तीच लस घ्या करू नका. जी लस उपलब्ध असेल, ती नागरिकांना द्या.” असे भुजबळ म्हणाले.

कोरोनाचा ज्वालामुखी

सुरुवातीला अनेकांनी रेमडेसीवीर (Remedesivir) लस नेल्या. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. एक-दोन दिवसात हा गोंधळ संपुष्टात येईल. ही काही क्रोसिनची गोळी नाही की लगेच मिळेल. सहज मिळणारे हे औषध नाही. यात अडचणी आहेत. राज्यभरात अडचण आहे, हे मी नाकारत नाही. राज्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला. ज्वालामुखी फुटेल असे वाटले नव्हते. नागरिकांनी निर्बंध पाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे भुजबळांनी सांगितले.

रेमडेसिवीर इंजेक्शनासाठी आंदोलन

गेल्या चार-पाच दिवसात शहरामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची प्रचंड टंचाई जाणवत आहे. यामुळे नाशिकमध्ये नागरिकांचा बांध फुटला आहे. त्याबरोबर नागरिकांनी महात्मा गांधी रोडवर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. याकडे भुजबळांचे लक्ष वेधण्यात आले. लोक रस्त्यावर उतरणार त्याला काय करणार? अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. माझ्या घरात तर मी इंजेक्शनचा साठा केलेला नाही. कलेक्टरच्या घरातही साठा नाही, असे सांगतानाच एखाद्या दुकानात जर साठा करण्यात आलेला असेल आणि मला कळले, तर तिथे जाऊन कारवाई करून इंजेक्शन रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले असते, असे भुजबळ म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button