साताऱ्यातील जनता दोन्ही राजेंच्याच पाठीशी

Shivendra Raje and Udayan Raje

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यातील ग्राम पंचायतीवर राजेंचाच प्रभाव कायम राहिला. दोन्ही राजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही जनता मात्र त्यांच्याच सोबत कायम राहिल्याचे चित्र या निवडणुकीतून दिसले. खा. उदयनराजे, (Udayan Raje) आ. शिवेंद्रराजे (Shivendra Raje) गटाने सरशी केली असून राष्ट्रवादी काँग्रेसला बहुतांशी ग्रामपंचायतीत धोबीपछाड केले आहे. तालुक्यातील मात्र कोरेगाव मतदार संघातील काही ग्रामपंचायतीत आ. महेश शिंदे यांनी हस्तगत केलेली सत्ता आणि काही ग्रामपंचायतीत केलेला चंचूप्रवेश आ. शशिकांत शिंदे यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.

सातारा तालुक्यातील प्रतिष्ठेच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का बसला असून राजे गटाने वर्चस्व मिळवले आहे. 89 पैकी सुमारे 77 ग्रामपंचायती आ. शिवेंद्रराजे व खा. उदयनराजे यांच्या गटाकडे गेल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या ताब्यात अवघ्या 12 ग्रामपंचायती राहिल्या. सातारा तालुक्यातील मात्र कोरेगाव व कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीची सरशी झाली आहे. त्याचबरोबर आ. महेश शिंदे यांनी सातारा तालुक्यात जोरदार धडक मारत संगममाहुली, चिंचणेर वंदन, तासगाव, वाढे या गावांत सत्ता खेचून आणली आहे.

सातारा तालुक्यात 130 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 39 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. मात्र 89 ग्रामपंचायतींमधील 1 हजार 182 सदस्यांसाठी निवडणूक झाली. आंबवडे खुर्द, भोंदवडे ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचे अर्ज दाखल झाले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER