कोरोना पसरवणाऱ्या मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे – राज ठाकरे

Raj Thackeray

मुंबई :- लॉकडाऊनची शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल अशी भीती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी इतकी शांतता आपण १९९२-९३ च्या दंगलीतही पाहिली नव्हती, असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते, असं म्हटलं आहे.

दिल्लीमधील निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना राज ठाकरे यांनी मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि डॉक्टरांना त्रास देणाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारा. यांच्यावर उपचार कसले करता? असा प्रश्न उपस्थित करत धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही; पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. सध्या लॉकडाऊन सुरू आहे, नंतर आम्ही आहोतच.” असं राज ठाकरेंनी खडसावून सांगितलं. निवडणुकीवेळी मुस्लिम समाजाचे मुल्ला मौलवी बैठका घेऊन कोणाला मतदान करायचे, कोणाला नाही, हे समाजातील लोकांना सांगतात. मात्र कोरोनाच्या जनजागृतीसाठी बैठका घेतल्या नाही. आज का प्रबोधन करत नाहीत? आता कुठे गेले ते? मी त्यांना शोधणार आहे. मुस्लिम समाजातील काही लोक संशयाची परिस्थिती निर्माण करताहेत. कितीही तुपात तळले तरी ते कडूच राहतात, अशी त्यांची प्रवृत्ती आहे. आता सध्या लॉकडाऊन आहे. मात्र नंतर आम्ही त्यांना शोधू, असा इशाराही त्यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : आता कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, ठाकरे सरकारचा उपक्र;समुपदेशनासाठी 24 तास हेल्पलाईन सुरू

धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे. ही काळा बाजार करायची वेळ आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. तसंच पोलीस, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे. त्यांचे व्हिडीओ व्हायरल केले पाहिजे. यांची हात उचलायची हिंमत होते कशी ? पोलिसांना तुम्ही शिव्या देता ? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. मी मुख्यमंत्र्यांना यावर कडक पावलं उचलली पाहिजे, अशी विनंती केली आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

पंतप्रधानांच्या भाषणातून काही तरी आशेचा किरण दिसायला हवा होता. मात्र त्यांनी लोकांना दिवे लावायला सांगितले. अनेक बाबतीत संभ्रम आहे. पुढं काय होणार आहे हे कोणालाच कळत नाही. हा संभ्रम संपवणं सत्ताधाऱ्यांचं काम आहे. लोक सध्या घरातच आहेत. त्यामुळे लोक दिवे पेटवतील. नाही तरी लोकांना सध्या काम नाही. श्रद्धा-अंधश्रद्धेचं सोडून द्या. त्यामुळं कोरोनावर परिणाम झाला तर चांगलंच आहे, असेही ते म्हणाले. तुम्हीच डॉक्टर होत असाल तर राज्यातले वैद्यकीय कर्मचारी का मेहनत करताहेत? घरोघरी डॉक्टर झालेत. कोणी म्हणतं गोमूत्र प्या, कुणी म्हणतं लसूण खा, असा सल्ला देणारेही भरपूर लोक आता पुढे आले आहेत.

माध्यमांचंही अभिनंदन आणि आभार. पत्रकार सर्वत्र फिरून बातम्या गोळा करत आहेत; मात्र त्यांनाही कुटुंब आहे. समाजाची सर्वांत मोठी जबाबदारी आहे. नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञही असायला हवं.

लोकांनी शिस्त पाळली नाही तर लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या बाबतीत कठोर पावलं उचलावी लागतील, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. लॉकडाऊनची शिस्त पाळा, अशी माझी विनंती आहे. यंत्रणेवर ताण आला तर सरकारवर येईल. त्यामुळे उद्योगधंद्यावर परिणाम होईल, नोकऱ्या जातील. हे सगळं आपल्या एका चुकीमुळे होणार आहे. पोलिसांना सहकार्य करावे. मी पोलिसांचे अभिनंदन करतो. त्यांनी मुंबईतील मरकजच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली. त्यामुळे मुंबई वाचली. आताही मी लोकांना विनंती करतो, शिस्त पाळा, अन्यथा लॉकडाऊन वाढेल. त्यामुळे देशावर मोठं आर्थिक संकट उभं राहील, सरकारलाही हे आवरणं कठीण होऊन जाईल, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला.


Web Title : People of merkaz who spread corona should be shot and killed – Raj Thackeray

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)