‘जनतेसाठी झटणाऱ्याला लोक कधीही विसरत नाही’, त्यामुळे…पवारांचा कानमंत्र

Sharad Pawar

पुणे: लोकांसाठी सतत झटत राहा, जो लोकसांसाठी झटत असतो त्याला लोक कधीच विसरत शकत नाहीत, त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत बांधिलकी ठेवा, असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वो शरद पवार (Sharad Pawar) यांनी कार्यकर्त्यांना दिला. आज शरद पवार यांच्या हस्ते वारजे येथे 45 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी त्यांनी खडकवासला परिसरातील आठवणींना उजाळा देतानाच कार्यकर्त्यांना राजकारणात पुढे जाण्यासाठी कानमंत्रही दिला.

यावेळी ते म्हणाले की, जो जनतेसाठी सतत झटत असतो, त्याला लोक कधीही विसरु शकत नाही. त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत बांधिलकी ठेवा. इथल्या तरुणांनी 45 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं मोठं कार्य केले आहे. राष्ट्रध्वज प्रत्येक देशाच्या अभिमानाचं प्रतिक असतं. आपला तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या अभिमानाचं प्रतिक आहे.

यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितलं की, खडकवासला परिसरात मला एकेकाळी प्रचंड मताधिक्य मिळायचे. माझ्याकडे तेव्हा राज्याची आणि राज्याबाहेरची जबाबदारी असायची. त्यामुळे खडकवासला परिसरात प्रचाराला यायला वेळ मिळायचा नाही. त्यामुळे केवळ दोन तास जरी या भागात प्रचाराला आलो तरी विक्रमी मते मिळायची. पूर्वी खडकवासलातील प्रत्येक गावात स्थानिक नेतृत्व पुढे असायचं. गावात एकोपा होता. गाव कुटुंबासारखं रहायचं. आता गावामध्ये आलो तर कुठे आलो हे कळत नाही. शेती उद्ध्वस्त झाली. सोसायट्या आल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक इथे येऊन राहत आहेत, असं सांगतानाच आता गावातील तरुण गावाच्या विकासासाठी पुढे येत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. हा परिसर बदलतोय. तो नीटनेटका राहावा, असंही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ‘जनतेसाठी झटणाऱ्याला लोक कधीही विसरत नाही’, त्यामुळे…पवारांचा कानमंत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER