साध्वी प्रज्ञा यांनी देशाच्या आत्म्याची हत्या केली – कैलाश सत्यार्थी

Kailash Satyarthi, sadhvi-pragya

नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे कौतुक करताना त्याला देशभक्त म्हटले होते. त्यावर नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी संताप व्यक्त केला आहे . सत्ता आणि राजकारणापलीकडे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्थान आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारखे लोक भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत, असे ते म्हणाले.

नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या शरीराची हत्या केली; पण प्रज्ञासारखे लोक आत्मा, अहिंसा, शांतता, सहिष्णुता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत. महात्मा गांधी हे सत्ता आणि राजकारणाच्या पलीकडे होते. भाजपने छोट्या फायद्याचा मोह सोडून त्यांना तत्काळ पक्षातून काढून राजधर्माचे पालन करावे, असे सत्यार्थी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे कौतुक करताना त्याला देशभक्त म्हटले होते. साध्वी प्रज्ञा यांच्या या विधानावरून सर्व स्तरांवरून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती . वाद झाल्यानंतर लगेच साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली होती.