… पण युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी करून दाखवले

Yuvasena

मुंबई : राज्याच्या काही भागात तौक्ते चक्रीवादळाने प्रवेश केला आहे .यामुळे रत्नागिरी (Ratnagiri), सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur) आणि इतर भागात मोठे नुकसान केले आहे . पुण्यात देखील सोसाट्याच्या वाऱ्याने मोठंमोठी झाडं पडल्याचे देखील दिसले आहे. अशातच खेडच्या कशेडी घाटात एक मोठं झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

कशेडी घाटात झाड पडल्यामुळे जवळजवळ 1 तास वाहतूक खोळंबली होती. तरीही लोकांनी वाहनाबाहेर पडून जाण्यासाठी मार्ग काढला नाही. लोकं गाड्या माघारी फिरवू लागली. त्यामुळे घाटात गर्दी झाली. झाड पडल्यानं वाहतूक खोळंबा झाल्याचं कळताच खेड तालुका युवासेना (Yuvasena) व युवतीसेनेचे कार्यकर्ते मदतीला धावले. अनेकदा प्रयत्न करून देखील हे झाड हलले नाही.

वाहतूकीत अडकलेल्या लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. त्याचबरोबर त्यांनी घाट वाहतुकीस मोकळा करून दिला. या कार्यकर्त्यांनी पुढे सरसावून भले मोठे झाड बाजूला करून मदत केल्याबद्दल शिवसेनेने त्यांचे कौतुक देखील केलं आहे.

यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष अजिंक्य मोरे, तालुका सचिव राकेश सागवेकर, शहराध्यक्ष सिद्धेश खेडेकर, शहर सचिव प्रसाद पाटणे, उपशहराध्यक्ष आदित्य चिखले, युवतीसेना शहराध्यक्ष पूनम जाधव, सिद्धी शिंदे, लीना खेडेकर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button