जनता पर्यायाच्या शोधात – उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray

मुंबई : हिंदुत्वाची मक्तेदारी भाजपाकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुधवारी एका कार्यक्रमात म्हणालेत.

ठाकरे म्हणालेत, ‘‘मी अयोध्येला गेलो तेव्हाच स्पष्ट केले होते, की भाजपापासून दूर गेलो आहे, हिंदुत्वापासून नाही. हिंदुत्वाचे ‘पेटंट’ भाजपाने (BJP) घेतलेले नाही; पण शिवसेना महाराष्ट्रापुरती राहिल्याने दरम्यानच्या काळात हिंदुत्वाचा पर्याय उभा करण्याबाबत देशात एक पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्याची गरज आहे. एखादा पक्ष ती एकटा भरून काढेल किंवा काही जण एकत्र येऊन भरून काढतील; पण आता पर्याय हवा असे लोकांना वाटू लागले असून, लोकांना वाटते तेव्हा पर्याय उभा राहतो,’’ असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात देशात नवी समीकरणे उदयाला येऊ शकतात, असे सूचित केले.

शिवसेना (Shiv Sena) आता महाराष्ट्राच्याबाहेर इतर राज्यात विस्तार करणार आहे, असे सांगताना उद्धव ठाकरे म्हणालेत की, बाबरी मशीद पडल्यावर इतरांनी हात झटकले; पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ती मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असे विधान केले. त्या एका वाक्याने शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल देशात लोकांना-नेत्यांना आकर्षण वाटू लागले; पण आम्ही त्या वेळी देशात मित्रपक्ष भाजपा हिंदुत्वाचा झेंडा घेत असल्याने हिंदुत्ववादी पक्ष म्हणून महाराष्ट्रातच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इतर ठिकाणी अनेक चांगले कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले. आता इतर राज्यांत शिवसेनेचे हिंदुत्व आवडत असेल तर जरूर काम करा, अशी भूमिका आम्ही घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER