मोदींनी भाजपला तर बाळासाहेबांनी शिवसेनेला सत्ता दिली : राज ठाकरे

Raj Thackeray

मुंबई :- भारतातील निवडणुका प्रतीकांवर घेतल्या जातात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवसेनेला  (Shiv Sena) तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपला सत्ता दिली, असे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

राज ठाकरे यांनी देशातील निवडणूक आणि नागरिकांच्या मानसिकेतेवर भाष्य केले. कोरोना (Corona) आजार आहे, पण तो मानसिक आजार आहे. आता लोकांची मानसिकता निवडणुका घेण्याची नाही. समाज राहिला तर निवडणुका होतीलच. समाजाचे मन स्थिर होणे महत्त्वाचे आहे. नेत्यांनी समाज स्थिरस्थावर करण्यावर भर द्यावा. मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझे तोंड आणि माझ्या सहकार्याचे काम आहे. एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून बघितले जाते. भारतात निवडणुका प्रतीकांवर होत असतात. लोकांनी मोदींना पाहून मतदान केले. तर बाळासाहेबांना पाहून सत्ता दिली. देशात जो लाट निर्माण करतो तो जिंकतो. सध्या कोरोनाच्या लाटेवर सगळे स्वार आहेत, असा चिमटा राज ठाकरेंनी काढला.

पराभव
“आम्ही नाशिकमध्ये चांगले कामे केले. पाच वर्षांत एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. पाणीप्रश्न मिटवला. हे चांगले की वाईट? लोकांनी साथ दिली तर हुरूप येतो. लोकांना नेमके हवे तरी काय? इतरांसारखेच वागायचे का? असे सवाल करताच लोक कामाची अपेक्षा करतात आणि मतदान दुसऱ्याला करतात. यामुळेच वर्षानुवर्षे तेच प्रश्न राहतात. गटारी तुंबल्या, रस्ते तसेच, प्रश्न तेच, वर्षानुवर्षे तसेच सुरू असतात. समाजाने काम केले तर शाबासकी द्यावी, नाही तर त्यांना बाजूला करावे, हे जेव्हा घडेल तेव्हा सर्व काही व्यवस्थित होईल. अजित पवारांनी (Ajit Pawar) पिंपरीत खूप मोठे काम केले, पण नशिबी काय आले, तर पराभवच.” असे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राला मदत का नाही?
मास्क लावण्याला माझा विरोध नाही. पण घरात असताना मास्क लावायचेच का? मास्क लावलेल्या लोकांना कोरोना झाला नाही का? मी रुग्णालयात ऑपरेशनसाठी गेलो होतो. मास्क लावल्यामुळे गुदमरायला होत होते. दुसरी लाट आली तेव्हा आपली सरकारं अलर्ट नव्हती, असा आरोपही त्यांनी केला. वादळ आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला गेले. तिथे त्यांनी एक हजार कोटींचे  पॅकेज दिले. महाराष्ट्र आणि गोव्याला का मदत दिली नाही? केंद्राने असे वागायला नको. केंद्र आणि राज्याने संकटाच्या काळात सोबत काम करायला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button